खालापूर – खालापूर तालुक्यातील ग्रामीण हाळखुर्द गावातील रायगड जिल्हा परिषदेच्या 100 वर्ष जुनी असलेल्या उर्दू शाळेचा भूमिपूजन सोहळा आमदार महेंद्र थोरवे हस्ते पार पडला. यावेळी ग्रामस्थांनी आ.महेंद्र थोरवेंचे आभार मानले.
यावेळी आमदार महेंद्र थोरवे, नौफिल सय्यद, हुजेफा सय्यद, विजय पाटील, शिवराम बदे, संजय देशमुख, संदेश पाटील, रोहित विचारे, रेश्मा आंग्रे, सुरेश देशमुख, रोहिदास पिंगळे, हुसेन खान, खालापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे, शबनम मुल्ला, अजीम मांडलेकर उपस्थित होते. आमदार थोरवे म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या शाळेतून ग्रामीण भागातील नवी पिढी घडवायची आहे.
सध्या अनेकांचा कल इंग्रजी शाळांकडे असला तरी, खऱ्या अर्थाने शिक्षणाचे बालकडू हे जिल्हा परिषदेच्या शाळेतून मिळत आहेत. शाळेच्या नवीन बांधकामात 6 वर्ग खोल्या, संरक्षण भिंत व इतर बांधकाम करण्यात येणार आहे. त्यासाठी 1 कोटी 15 लाख मंजूर झाले आहे.