T20 World Cup 2024 (Super 8, IND vs AFG) : टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या ग्रुप मॅचमध्ये चमकदार कामगिरी केली. आता ती सुपर 8 सामन्यांसाठी मैदानात उतरणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा पहिला सामना अफगाणिस्तानविरुद्ध आहे. हा सामना 20 जून रोजी रात्री 8 वाजता होणार आहे.
क्रिकेट चाहत्यांना हा सामना मोफत पाहता येणार आहे. यासाठी एक रुपयाही द्यावा लागणार नाही. भारत-अफगाणिस्तान सामना पाहण्यासाठी फक्त स्मार्टफोन आणि इंटरनेट आवश्यक असेल.
वास्तविक, T20 विश्वचषक 2024 चे थेट प्रक्षेपण देखील मोबाईल ॲपवर येत आहे. त्याचे अधिकार हॉटस्टारकडे आहेत. जर तुम्हाला भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सुपर 8 सामना विनामूल्य (Free) पाहायचा असेल तर तुम्हाला यासाठी स्मार्टफोन आणि इंटरनेटची आवश्यकता असेल. तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवर हॉटस्टार ॲप डाउनलोड करावे लागेल आणि त्यानंतर तुम्ही सामन्याचा मोफत आनंद तुम्ही घेऊ शकाल. जर तुम्हाला हॉटस्टारवर एचडी क्वालिटीमध्ये किंवा लॅपटॉपवर सामना पाहायचा असेल, तर तुम्हाला त्यासाठी पैसे (subscription) द्यावे लागतील.
सुपर 8 स्पर्धा भारतासाठी सोपी नसेल. भारताला अफगाणिस्तानकडून कडवं आव्हान मिळेल. अफगाणिस्तान टी-20 विश्वचषकात क गटात आहे. त्यांनी 3 सामने खेळले आणि तिन्ही जिंकले. अफगाणिस्तानने न्यूझीलंडला उलटफेरचा बळी बनवले होते. त्याचा 84 धावांनी पराभव केला होता. अफगाणिस्तान संघाचे खेळाडू फॉर्मात असून चांगली कामगिरी करत आहेत. त्यामुळे टीम इंडियाला सावध राहावे लागणार आहे.
T20 विश्वचषक 2024 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीवर नजर टाकली तर रहमानउल्ला गुरबाज पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने 3 सामन्यात 167 धावा केल्या आहेत. गुरबाजने गोलंदाजांची चांगलीच धुलाई केलेली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या यादीतील टॉप 10 मध्ये एकही भारतीय फलंदाज नाही. यावेळी भारताकडून ऋषभ पंतने सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने 3 सामन्यात 96 धावा केल्या आहेत.