पुणे – पावसाला सुरुवात होताच साथीच्या आजारांसह डेंग्यू, चिकुनगुणियाच्या रुग्णांमध्ये वाढ होते. त्यामुळे यंदा ही साथ वेळीच रोखण्यासाठी नागरिकांनी आत्तापासून “अलर्ट’ राहावे. पावसामुळे रहिवासी परिसर, गोडाऊन, मोकळ्या जागा या ठिकाणी साचणारी पाण्याची डबकी वेळोवेळी स्वच्छ ठेवा आणि डासांची पैदास टाळा, प्रशासनाने केले आहे.
ईडिस इजिप्ती या डासापासून डेंग्यूची लागण होते. हा डास मानवी वस्तीजवळ अधिक आढळतो. भांडी, टायर, टब, फुलदाण्या, कुंडया, पिंप, बादल्या, कूलर, नारळाच्या कवट्या यांसह अन्य ठिकाणी पाणी साठून राहिल्यावर ईडिस या डासाची पैदास होते. पावसाळ्यात ही पैदास झपाट्याने होते. त्यामुळे आपल्या परिसरात कुठे पाणी साचलेले नाही ना? त्यात अळ्या नाही ना, याची खात्री करून घ्यावी. आठवड्यातून एकदा तरी घर, इमारत परिसरात साचलेली पाण्याची ठिकाणे रिकामी करावीत, ज्या ठिकाणी पाणी साचून अळ्या होण्याची भीती आहे, अशा वस्तू काढून टाकाव्यात, घराच्या परिसरात भंगार वस्तू किंवा बांधकाम साहित्याचा साठा करू नये, पाण्याच्या टाकीमध्ये गप्पी मासे सोडावेत, आवश्यक तिथे औषध फवारणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
डेंग्यूची लक्षणे
जास्त ताप, तीव्र डोकेदुखी, डोळ्यांमागे वेदना, स्नायू आणि सांधेदुखी, मळमळ, उलट्या, ग्रंथींना सूज, रॅशेस यांपैकी कोणतेही लक्षण. सातत्याने उलट्या, पोट आणि खालच्या भागात वेदना, श्वासोच्छवासाचा वेग वाढणं, थकवा, हिरड्यांतून रक्त येणं अशीही लक्षणं असू शकतात.
अशी घ्या काळजी…
- घराबाहेर पडताना पूर्ण अंग झाकेल, असे कपडे घालावे
- मच्छर चावू नये म्हणून मच्छरोधक मलमचा वापर करावा
- अडचणीच्या ठिकाणी किंवा डासांची पैदास होते, अशा ठिकाणी जाणे टाळावे
- रात्री झोपताना मच्छरदाणी लावून झोपावे
- दिवसभर घरात मॉस्किटो लावावे
- घरात मच्छर नाही ना याची खबरदारी घ्यावी
- कुंड्यांमध्ये पाणी राहणार नाही, याची काळजी घ्यावी
पावसामुळे टेरेस, मोकळी जागा, गोडाऊन परिसर याठिकाणी टायर, फुटकी भांडी यांसह अन्य ठिकाणी पाणी साचते आणि डासांची पैदास होते. हे टाळण्यासाठी नापुणे महापालिकागरिकांनी आपल्या घराच्या परिसरात डबकी साचणार नाही याची काळजी घ्यावी. जेणे करून डेंगीचा प्रादुर्भाव टाळता येईल, असे पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. भगवान पवार म्हणाले.