नवी दिल्ली – वॉलमार्ट कंपनी आपल्या ई -कॉमर्स मार्केट प्लेसच्या माध्यमातून भारतीय उत्पादनाची अमेरिका, कॅनडात निर्यात करणार आहे. यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात भारतातील 500 कंपन्या आणि विक्रेते सहभागी झाले होते. कॅनडा व अमेरिकेत वॉलमार्ट ची हजारो स्टोअर आहेत. तेथे ऑक्टोबर नंतर मोठ्या प्रमाणात खरेदी होते. त्याचा फायदा भारतीय उत्पादकांना व्हावा यासाठी वातावरण निर्मिती करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
वॉलमाटच्या उपाध्यक्षा मिशेल मी म्हणाल्या की, आम्ही अधिकाधिक भारतीय कंपन्यांसोबत दीर्घकालीन संबंध निर्माण करण्यावर भर देत आहोत. यातूनच 2027 पर्यंत भारतातून दरवर्षी होणारी आयात 10 अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
चालू खात्यावरील तूट कमी करण्यासाठी भारत सरकार प्रयत्न करीत आहे. भारतातून निर्यात वाढल्यास त्यामुळे चालू खात्यावरील तूट कमी होण्यास मदत होणार आहेत. भारतातील नाविन्यपुर्ण व दर्जेदार उत्पादनांना जागतीक बाजारपेठ उपलब्ध व्हावी याकरीता आम्ही प्रयत्न करीत असून आम्हाला भारतीय उत्पादक प्रतिसाद देत असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही भारतीय कामकाज वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणथा गुंवणकू करणार असल्याचे त्या म्हणाल्या.