मुंबई – जागतिक बाजारातील अस्थिरतेचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर होत आहे. आज धातू, बॅंकिंग आणि वित्तीय कंपन्यांच्या शेअरची विक्री झाल्यामुळे निर्देशांकामध्ये घट झाली. मात्र कालच्या तुलनेमध्ये आज झालेली घसरण आज कमी होते. बाजार बंद होताना मुंबई शहर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स केवळ 37 अंकांना कमी होऊन 57,107 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी आठ अंकांनी कमी होऊन 17,007 अंकावर बंद झाला.
आजच्या विक्रीचा फटका टाटा स्टील, स्टेट बॅंक, टायटन, कोटक बॅंक, टेक महिंद्रा, आयसीआयसीआय बॅंक आणि एचडीएफसी बॅंकेला बसला. तर पावर ग्रिड, इंडसइंड बॅंक, डॉक्टर रेडीज, एचसीएल टेक्नॉलॉजी, नेस्ले या कंपन्यांच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ झाली.
सेन्सेक्स संदर्भातील 30 पैकी 18 कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली तर 12 कंपन्यांच्या शेअरचे भाव वाढले. हॉंगकॉंग, जपान आणि दक्षिण कोरियातील शेअरचे भाव आज वाढले होते तर युरोपात वातावरण संमिश्र होते. कच्चे तेल सध्या 84 डॉलरवर आले आहे. ही भारताच्या दृष्टिकोनातून नफादायक ठरणार आहे.
सोमवारी परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी 5,101कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. या गुंतवणूकदारांचा आगामी काळातही विक्री केली तर निर्देशांकावर परिणाम होण्याची शक्यता विश्लेषकांनी व्यक्त केली. अमेरिकेचा डॉलर बळकट होत असल्यामुळे या गुंतवणूकदारांना डॉलरच्या माध्यमातून गुंतवणूक केल्यानंतर नफा जास्त होतो. भारतात गुंतवणूक करायची असल्यास रुपयाच्या माध्यमातून गुंतवणूक करायची असते. रुपया घसरत असल्यामुळे त्यांना यातून जास्त परतावा मिळत नाही.