नगर – शहरात थोडा पाऊस झाला तरी न्यू आर्टस ,कॉमर्स ऍण्ड सायन्स महाविद्यालयाच्या रस्त्यावर पाण्याचे डबके साठते. त्यातून मार्ग काढतांना वाहनांना मोठी कसरत करावी लागते. कित्येकदा यारस्त्यावर छोटे मोठे अपघातही घडले आहेत. पाऊस उघडला आणि रस्ता वाळला की याच रस्त्यावरील वाहतुकी मुळे रस्त्यावर धूळ उडू लागते. त्यापासून अनेकांना श्वसनाचे त्रास सुरू झाले.
कित्येकदा दगड उडून व्यावसायिकांचे नुकसान होते. इतक्या तक्रारी असतांना हा रस्ता दुरूस्त व्हावा अशी मागणी करणाऱ्यांकडे दुर्लक्ष का होते, असे एक ना अनेक प्रश्न सर्वांनाच सतावतात मात्र गेली तीस वर्षे हीच परिस्थिती आहे वर्षातून दोन वेळा यारस्त्याची डागडुजी होते मात्र पुन्हा पहिले पाढे पंचावन्न, मात्र आता हा प्रश्न कायम स्वरुपी मिटण्याची आशा निर्माण झाली आहे.
या बाबतीत सार्वजनिक बांधकाम विभागाशी अनेकदा पत्रव्यवहार करण्यात आला असून त्यामंतर या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले मात्र या भागातून गेलेल्या गटारीतून पिण्याच्या पाण्याच्या जलवाहिन्याही गेल्या असल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याने हे काम करण्यास नकार दिला .त्यानंतर मनपाने तेथील जलवाहिन्या काढुन दुसरी कडून नळ जोडण्या दिल्या आणि याभागात बंदपाईप टाकून दिल्याने आत पुन्हा सार्व जनिक बांशकाम खात्याने या कामास होकार दिला अहे मात्र ज्या नळ जोडण्या तोडुन पुन्हा जोडण्यात आल्या तेथुन आता मैला मिशीत दुषीत पाणी येत असल्याच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत.
या रस्त्याच्या दुतर्फा गटारी असल्याने हा रस्ता वरच्यावर खराब होतो मात्र आता भर पावसाळ्यात निलक्रांत्री चौकात मोठे सिमेंट कॉक़्रिटचे पाईप टाकण्यात आले. एका बाजुच्या गटारीतही पाईप टाकण्यात आले. आता पावसाळा संपल्यावर दुसऱ्या बाजूच्या गटारीतही पाईप टाकण्यात येणार आहेत. त्यानंतर हा रस्ता थोडा उचलून घेवून त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. मात्र, आता मुलभूत योजनेतून करण्यात येणार असल्याने तेथे आता याठिकाणी सिमेंट कॉंक्रिटचा रस्ता करावा अशी नागरीकांची मागणी आहे.
कोट रस्त्याचं काम सुरू झाले त्याला तीन महिने लोटले.त्याने व्यावसायिक नुकसान होते. दर दिवाळीला हीच अडचण होते. गटारी उघड्या असल्यामुळे दुर्गंधी पसरते. त्यामुळे साठीच्या आजारांचा फैलाव होवू लागला आहे.
केदारी , व्यावसायिकदरवर्षी पॅचिंग वरच्यावर केले जाते मात्र रस्ता खचत असल्याने हा रस्ता कॉंक्रिटचा करावा. अन्यथा पुन्हा पहिले पाढे पंचावन्न अशी अवस्था झाल्यावाचून राहणार नाही.
मितेश शहा , व्यावसायिक