नेवासा – भेंडा बुद्रुक (ता.नेवासा) येथील ज्ञानदेव शिरसाट या शेतकऱ्याच्या ९ म्हशी विद्यूत वाहक तारेचा शाॅक लागून मृत्यू पावल्याची दुर्दैवी आणि अंत:करणाला तीव्र वेदना देणारी घटना बुधवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास घडली आहे.
म्हशीच्या वाढलेल्या किंमती, त्यांना लागणारा खुराक – चारा, रात्रंदिवस करावे लागणारे कष्ट… म्हशीच्या निगराणीसाठी शेतकऱ्यांना मोठी मेहनत घ्यावी लागत असतांना ज्ञानदेव शिरसाट या शेतकऱ्यांच्या 9 म्हशींचा विजेच्या धक्याने मृत्यू झाला.
विद्युत प्रवाहाची विद्युत वायर तुटून म्हशींच्या संपर्कात आली त्यामुळे 9 म्हशी शॉक लागून दगावल्यामुळे मुक्या प्राण्यांचा जीव तर गेलाच तसेच यात शेतकरी शिरसाट यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाने या घटनेचा पंचनामा करुन नुकसान भरपाई मिळण्याची मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.