मुंबई – दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री श्रिया सरनने ‘दृश्यम’ आणि ‘दृश्यम 2’ या चित्रपटातून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या चित्रपटात तिने अभिनेता अजय देवगणच्या पत्नीची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक करण्यात आले होते. याशिवाय श्रिया सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. अनेक व्हिडिओ आणि फोटो ती शेअर करत असते. नुकतेच तिने तिचा स्टायलिश अंदाजातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
View this post on Instagram
श्रियाने नवीन फोटोशूट केले आहे. जे फोटो तिने तिच्या इनस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोत तिने काळ्या रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला आहे. यावर रंगीबेरंगी डिझाईनही दिसून येत आहे. या फोटोमधील तिचा ग्लॅमरस अंदाज अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. यात तिने एकापेक्षा एक हटके पोज दिल्या आहेत.
View this post on Instagram
दरम्यान, अभिनेता रजनीकांत यांच्या ‘शिवाजी द बॉस’ या 2007 साली आलेल्या चित्रपटातही श्रिया झळकली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. 2001 साली आलेल्या ‘इश्तम’ या तेलुगू चित्रपटातून श्रियाने अभिनयाला सुरुवात केली. श्रियाने तेलुगु, तामिळ आणि हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने तिने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीपासून ते बॉलिवूडमधील चित्रपटात तिने चाहत्यांची मने जिंकली आहेत.