Sports In Pune – ग्रेसिया स्पोर्ट्स मॅनेजमेंट यांच्या तर्फे आयोजित ‘विराट करंडक’ १४ वर्षाखालील मुलांच्या अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत सय्यद क्रिकेट अॅकॅडमीने स्टार स्पोर्ट्स क्रिकेट अॅकॅडमी आणि गॅरी कस्टर्न क्रिकेट अॅकॅडमी या संघांचा पराभव करून सलग दोन विजयांची नोंद केली. धायरी येथील स्टार स्पोर्ट्स अॅकॅडमी मैदानावर सुरू असलेल्या स्पर्धेत अव्देत वाणी याच्या नाबाद १३९ धावांच्या जोरावर सय्यद क्रिकेट अॅकॅडमीने स्टार स्पोर्ट्स क्रिकेट अॅकॅडमीचा १९३ धावांनी सहज पराभव केला.
अव्देत याने ६२ चेंडूत १८ चौकार आणि ९ षटकारांसह १३७ धावांची नाबाद खेळी साकारली. हर्ष पाश्ते याने नाबाद ९८ धावांची खेळी केली. या दोघांनी चौथ्या गड्यासाठी ११३ चेंडूत २४८ धावांची अभेद्य भागिदारी रचली. या विशाल धावसंख्येसमोर स्टार स्पोर्ट्स क्रिकेट अॅकॅडमीचा डाव ९२ धावांवर मर्यादित राहीला. दुसर्या सामन्यात हर्ष पाश्ते याच्या अष्टपैलु खेळीमुळे सय्यद क्रिकेट अॅकॅडमीने गॅरी कस्टर्न क्रिकेट अॅकॅडमीचा ४८ धावांनी सहज पराभव केला.
Virat Kohli : ‘विराट-अनुष्का’ने मुलाचे नाव ठेवले ‘अकाय’, जाणून घ्या…. ‘Akaay’ चा नेमका अर्थ काय?
पहिल्यांदा फलंदाजी करताना सय्यद अॅकॅडमीने १९३ धावा धावफलकावर लावल्या. साईराज जगताप (७५ धावा) आणि हर्ष पाश्ते (५८ धावा) यांनी संघाच्या डावाला आकार दिला. या आव्हानासमोर गॅरी कस्टर्न क्रिकेट अॅकॅडमीचा १४५ धावांवर मर्यादित राहीला. आलप पंगु याच्या कामगिरीमुळे गॅरी कस्टर्न क्रिकेट अॅकॅडमीने हेमंत किणीकर क्रिकेट अॅकॅडमीचा ५६ धावांनी पराभव केला. श्रेयस गायकवाड याच्या ७९ धावांच्या कामगिरीमुळे रायझिंग क्रिकेट क्लबने एके स्पोर्टस्चा १३ धावांनी पराभव करून विजयी कामगिरी केली.