Sports In Pune – युवा उद्योजक आणि माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या वाढदिवसानिमीत्त सोमेश्वर फौंडेशनच्या वतीने आयोजित सुपर सनी विक”जिल्हा स्तरीय मुष्टियुद्ध स्पर्धेत अंतिम फेरीत शौर्य भोसले, सौरव धांडोरे, आदित्य शेटे, यश खरमाळे, अर्णव लोखंडे, साईराज चौधरी यांनी आपापल्या गटातील प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून विजेतेपद संपादन केले.
गोखले नगर येथील शहिद तुकाराम ओंबाळे मैदानावर आंतरराष्ट्रीय दर्जाची बॉक्सिंग रींग उभारलेल्या या मैदानात अंतिम फेरीत क्यूब बॉईजमध्ये २४ ते २६ वजनी गटात शौर्य भोसलेने पृथ्वीराज लोखंडेचा ५-० असा तर, ३० ते ३२ वजनी गटात सौरव धांडोरेने वैभव चव्हाणचा ३-२ असा पराभव करून विजेतेपद पटकावले. ३८ ते ४० वजनी गटात आदित्य शेटेने इशांत धोत्रेचा ३-२ असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
कॅडेट बॉईजमध्ये २८ ते ३० वजनी गटात यश खरमाळेने साई गायकवाडचा ५-० असा तर, ३० ते ३२ वजनी गटात हुन शेखने समर्थ सांगळेचा ५-० असा पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. ३५ ते ३८ वजनी गटात समर्थ सोनावणेने आदित्य उथवळचा ४-१ असा पराभव करून विजेतेपद पटकावले. सब-ज्युनियर गटात अलकन शेख(३१ ते ३३ वजनी गट), आर्यन सरतापे(४० ते ४३ वजनी गट), शौर्य द्विवेदी(४३ ते ४६ वजनी गट), श्रवण गुडेकर(४९ ते ५२ वजनी गट) यांनी विजेतेपद पटकावले. जुनियर गटात नीरज यादव(४४ ते ४६ वजनी गट), साईराज चौधरी(४६ ते ४८ वजनी गट),राजवीर सूर्यवंशी(५० ते ५२ वजनी गट), बी मृधूराज (६० ते ६३ वजनी गट) यांनी विजेतेपद पटकावले.
Manoj Tiwary : ‘रणजी करंडक’ स्पर्धेवरील भाष्य मनोज तिवारीला भोवले, BCCI ने केली मोठी कारवाई….
स्पर्धेचे पारितोषिक वितरण माजी नगरसेवक दत्ता बहिरट, अविनाश बागवे, रूपाली ठोंबरे, विनोद ओरसे, दयानंद इरकल, रवींद्र साळेगावकर, नयना वाघ, संतोष देसाई, गजानन पवार, प्रताप जाधव, मदन वाणी आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश शिंदे, इमरान तांबोळी, संतोष ओरसे, तुषार भिसे यांनी परिश्रम घेतले. सचिन इंगळे यांनी स्वागत तर समज शेख यांनी सूत्रसंचालन केले.