viral video : ज्यांना सापांची भीती वाटते अश्या लोकांनी हा व्हायरल व्हिडिओ अजिबात पाहू नका. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच च्यारलं होत असून, यामध्ये एक स्त्री अनेक मोठ्या सापांसह दिसते. ती त्यांच्यासोबत खेळ देखील आहे.
या व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ निर्माण केला असून लोक तो मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. यामध्ये एका महिलेचा मोठ्या अजगराला मिठी मारण्याचा धाडसी प्रयत्न पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत.
हा व्हिडिओ @thereptilezoo या यूजरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दिसणारी महिला प्राणीसंग्रहालय आहे, जी कोणतीही भीती न बाळगता या विशाल अजगरांशी खेळत आहे.
View this post on Instagram
या भितीदायक व्हिडिओमध्ये महिला अजगराला मिठी मारताना पूर्णपणे आरामात दिसत आहे. या धाडसी महिलेसाठी हे काम खूप सोपे असू शकते, परंतु व्हिडिओ पाहणारे लोक कमेंट करत आहेत आणि महिलेच्या सुरक्षेसाठी प्रार्थना सुद्धा करत आहेत.
इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल झाला असून तो आतापर्यंत 239K पेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे. नेटकरी यावर कमेंटचा भडीमार करत आहेत, एका नेटकऱ्याने विचारले आहे, ‘की अजगराच्या इतक्या जवळ जाणे सुरक्षित आहे का?
तर दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटले आहे की,अविश्वसनीय व्हिडिओ आहे हा. अश्या अनेक कमेंट या व्हायरल व्हिडिओवर येत आहे. यापूर्वी देखील अश्या पद्धतीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.