वाघोली – वाघोली तालुका हवेली येथील भैरवनाथ मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी नंदकिशोर भानुदास दरेकर (मानकरी) यांनी पुढाकार घेऊन शिवमंदिर परिसरातील वज्रलेप, दीपस्तंभ व इतर काम केल्याबद्दल ग्रामस्थांकडून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
ज्ञानोबा व भानुदास बंडोबा दरेकर (मानकरी) यांच्या स्मरणार्थ भैरवनाथ मंदिरात नंदकिशोर दरेकर (मानकरी) यांनी जीर्णोद्धाराचे काम केले आहे.यापूर्वी देखील खारवडे येथील श्री म्हसोबा देवस्थान ट्रस्टला दरेकर कुटुंबीयांच्या वतीने रुग्णवाहिका भेट देण्यात आली होती. वाघेश्वर मंदिर परिसरात यापूर्वी देखील मंदिर जीर्णोद्धारकामी नंदकिशोर दरेकर व त्यांच्या कुटुंबीयांनी मोलाचा हातभार लावला आहे.
वाघोली आणि पंचक्रोशीतील श्रद्धा स्थानांना सामाजिक बांधिलकी जोपासून नंदकिशोर दरेकर (मानकरी) व त्यांच्या कुटुंबीयांकडून केले जाणाऱ्या सहकार्याबद्दल वाघोली चे माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील, माजी सरपंच जयश्री राजेंद्र सातव पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य माऊली कटके, माजी उपसरपंच संजय सातव पाटील आदींनी अभिनंदन केले आहे.