पुणे – दैनिक प्रभातचे माजी कर्मचारी विजय दत्तात्रय लडकत यांचे बुधवारी दीर्घकालीन आजाराने निधन झाले. ते 53 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
प्रभात परिवारामध्ये सर्वांमध्ये मिळून मिसळून वागणारे सहकारी असा लडकत यांचा नावलौकीक होता. खिळे जुळवण्यापासून संगणकीय पानबांधणीपर्यतच्या काळातील प्रभातच्या स्थित्यंतराचे ते साक्षिदार होते.
शहरातील अनेक घटनांबाबत ते सजग असत. प्रभात परिवाराच्या वतीन दोन मिनटे स्तब्धता पाळून लडकत यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.