नवी दिल्ली : सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालेले आहे. त्यावेळी नेतेमंडळी नेहमी काही तरी वेगळे करून चर्चेत येत असतात. सध्या अशाच एका केंद्रीय मंत्र्याची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सुरु आहे. बुधवारी सकाळी जेव्हा केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया हे सायकलवरून संसद भवनात पोहोचले, तेंव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्काच बसला. दरम्यान, मांडविया यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत येत आहेत.
#WATCH | Union Health Minister Mansukh Mandaviya rides a bicycle to Parliament in New Delhi pic.twitter.com/OCW3K896WC
— ANI (@ANI) February 2, 2022
केंद्रीय आरोग्यमंत्री स्वत: सायकल चालवत संसदेत येत असताना, संसद आवारात उपस्थित असलेल्या सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. एका वृत्तसंस्थेने याविषयी ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये हे स्पष्टपणे दिसत आहे की, आरोग्यमंत्री मनसुख मांडविया सायकलने संसद भवनात पोहोचले आहेत.
विशेष म्हणजे याआधीही केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया सायकलने संसदेत पोहोचले होते. मनसुख मांडविया हे पर्यावरणवादी आहेत. बऱ्याचदा ते कार ऐवजी सायकलचा वापर करणे पसंत करतात. बऱ्याचदा ते सायकलवरून संसदेत आलेले असल्याने त्यांना सायकलवाले खासदार या नावाने देखील संबोधले जाते. ते एकदा सायकलवरून राष्ट्रपती भवनाच्या कार्यक्रमाला देखील पोहोचले होते.