नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीमध्ये (varanasi cricket stediam) पूर्वांचलच्या पहिल्या क्रिकेट स्टेडियमची पायाभरणी केली. पीएम मोदी (pm modi) आणि सीएम योगी (cm yogi) यांनी कार्यक्रमाला आलेल्या सर्व लोकांचे आणि पाहुण्यांचे आभार मानले. यावेळी, सर्वांचे लक्ष वेधून घेणारे चित्र पाहायला मिळाले. मंचावरील कार्यक्रमादरम्यान सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) पीएम मोदींना नमो नावाची टीम इंडियाची (team india) जर्सी दिली.
माजी क्रिकेटपटू कपिल देव, सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, रवी शास्त्री, दिलीप वेंगसरकर आणि बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी, बीसीसीआय सचिव जय शाह यांच्यासह अनेक दिग्गजांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.भारतरत्न सचिन तेंडुलकरने यावेळी पंतप्रधानांना नमो नावाची भारतीय संघाची जर्सी दिली. या जर्सीवर एक असा नंबर देखील टाकण्यात आला होता. (sachin tendulkar pm modi team india namo jersey)
कार्यक्रमादरम्यान सीएम योगी यांनी भाषण केले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बटण दाबून पूर्वांचलच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमचा आणि यूपीच्या तिसऱ्या स्टेडियमची पायाभरणी केली. यानंतर व्हिडिओच्या माध्यमातून स्टेडियमचे स्पष्टीकरण देण्यात आले.
#WATCH | Sachin Tendulkar with PM Modi and CM Yogi Adityanath at the event to mark the foundation stone laying of an international cricket stadium in Varanasi, UP pic.twitter.com/TjgIHNrelD
— ANI (@ANI) September 23, 2023
या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये भगवान शिव आणि काशीची झलक पाहायला मिळणार आहे. स्टेडियमचा आकार अर्धचंद्राच्या आकाराचा असेल, त्यात फ्लड लाइट्स त्रिशूलाच्या आकाराचे असतील. यावेळी ते म्हणाले की हे स्टेडियम देवाच्या थीमवर बांधले जाईल. खेळाबाबत समाजाचा विचार बदलले आहे.