विदिशा – इंद्र देवतांनी आनंदी व्हावे आणि चांगला पाऊस व्हावा म्हणून गावातील सरपंचाने थेट गाढवाची सवारी केल्याची अजब घटना समोर आली आहे. हा प्रकार मध्य प्रदेशामधील विदिशा जिल्ह्यातील रंगई गावाता घडला आहे. सरपंचांनी पावसाच्या देवाला आनंदी करण्यासाठी ही गाढवावरुव सवारी केली आहे. सरपंचांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.
https://www.facebook.com/edainikprabhat/videos/252454213077218
सुशील वर्मा असे या सरपंचाचे नाव आहे. मध्य प्रदेशच्या अनेक भागांमध्ये समाधानकारक पाऊस न झाल्याने येथील शेतकरी चिंतेत आहेत दरम्यान पाऊस यावा म्हणून येथील गावकरी अनेक प्रकारचे साकडे घालताना दिसून येत आहे.
गाढवाच्या या अनोक्या सवारीमध्ये सरपंचासह गावातील नागरिक, महिला आणि लहान मुलांनीही सहभाग घेतला आहे. ही सवारी पटेल बाबा देवस्थान इथून सुरू झाली आणि गणेश मंदिरापर्यंत पोहोचली. तिथे लोकांनी चांगल्या पावसासाठी प्रार्थना केली.यावेळी लोकांनी सरपंचांचे स्वागतही केले. सरपंच गाढवावर तर त्यांच्यासोबतचे लोकं बँड-बाजा वाजवत नाचत-गात जात होते. हाच व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
ग्रामीण भागात असे मानले जाते, की गावाच्या सरपंचाने गाढवाची सवारी केल्यास इंद्र देवता प्रसन्न होतात आणि पाऊस होतो. याच कारणामुळे मी गाढवाची सवारी केली, कारण जनतेच्या सुखात आणि दुखात सहभागी होणे हे एका प्रमुखाचे काम आहे. याच कारणामुळे आपण गाढवाची सवारी करून देवाकडे प्रार्थना केल्याचे सरपंच सुशील वर्मा यांनी सांगितले आहे.