प्रवाशांनी भरलेल्या चालत्या बसने पेट घेतला अन्…; बघा काळजाचा थरकाप उडविणारा व्हिडिओ

हैदराबाद : चालक मग तो कोणत्याही वाहनाचा असो त्याला आपले काम अत्यंत सावधपणे करणे गरजेचे असते. कारण चालकाच्या विश्वासावर सर्व प्रवासी प्रवास करत असतात. त्यामुळे चालकाने प्रत्येक क्षणाला प्रसंगावधान दाखवणे महत्वाचे असते. अशाच एका चालकाच्या प्रसन्गवधांमुळे अनेक प्रवाशांचे प्राण वाचल्याची घटना समोर आली आहे.

प्रवासाने खचाखच भरलेली बस अचानक पेट घेतली त्यावेळी चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे 30 प्रवाशांचा जीव वाचला आहे. या भयंकर घटनेचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. ही घटना तेलंगणातील हैदराबाद इथे घडली आहे.

घटनेतील तेलंगणा स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनची बस हनमकोंडा इथून हैदराबादकडे निघाली होती. मात्र, ही बस घानपूरजवळ पोहोचताच तिच्या इंजिनमधून धूर येऊ लागला. बघता बघता संपूर्ण बसनेच पेट घेतला . या बसमधून 30 प्रवासी प्रवास करत होते. मात्र, चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. प्रवाशांना वेळीच बसमधून खाली उतरवण्यात आले.

काहीच वेळात संपूर्ण बस जळून खाक झाली. स्थानिक लोकांनी सुरुवातीला ही आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीने रौद्ररुप धारण केल्याने हे सर्व प्रयत्न अपयशी ठरले आणि काहीच वेळाच पूर्ण बस जळून खाक झाली. ही आग इतकी भयानक होते की दूरदूरपर्यंत धुराचे लोट पसरले. ही संपूर्ण घटना आसपास उभा असलेल्या लोकांनी कॅमेऱ्याच कैद केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.