हरिद्वार : उत्तराखंड राज्यातील हरिद्वारमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. हरिद्वारमध्ये हिंदू तरूणाकडून मुस्लीम समाजातील एका जोडप्याला हिंदू तरूणाने गंगा घाटावरून हाकलून लावल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दोन मुस्लीम तरूण आणि एक तरूणी गंगा घाट येथे आले होते. तर तिथे असलेल्या हिंदू युवकाने त्यांना या स्थळावरून हाकलून लावत ही जागा फक्त हिंदूसाठी असल्याचे म्हटले आहे. या तरूणाने सांगितल्यानंतर मुस्लीम युवक आणि युवती या ठिकाणाहून निघून गेल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
In India, even Rivers have now religion – In Haridwar, a Muslim family is being driven away from going to the Ganges River, saying “Only Hindus are allowed here” pic.twitter.com/jEJBeYKxYt
— Ashok Swain (@ashoswai) June 19, 2023
दरम्यान, हे तरूण या धार्मिक स्थळावर पर्यटनासाठी आल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आणि त्यांना हाकलून देण्यात आले आहे. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून त्यावर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.