औरंगाबाद – ठाकरे सरकारमधील शिवसेनेचे मंत्री असलेले संदिपान भुमरे यांच्या भावाच्या भाईगिरीचा व्हिडियो सोशलवर चांगलाच व्हायरल झाला आहे. औरंगाबादमधील रस्त्याच्या गैरव्यवहाराबाबत रणजीत नरवडे हा कार्यकर्ता फेसबूक लाईव्ह करत होता.
रस्त्याच्या गैरव्यवहाराबाबत व्हिडियो सोशलवर शेअर केला तसेच रस्त्याच्या गैरव्यवहाराची तक्रार केल्याचा रागावरून संदिपान भुमरे यांचा भाऊ राजू भुमरे यांनी रणजीत नरवडे कार्यकर्त्याला बेदम मारहाण केली आहे.
दरम्यान, या घटनेनंतर पीडित रणजीत नरवडे याने स्थानिक पोलीस ठाण्यात राजू भुमरे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत.
नेमकं कोण आहेत संदिपान भुमरे?
संदिपान भुमरे हे औरंगाबाद मधील शिवसेनेचे मोठे नेते आहेत. त्यांची त्यांच्या मतदारसंघात मोठी वचक आहे. भुमरे हे १९९५ पासून ते पैठण मतदारसंघातून सलग पाच वेळा ते विधानसभेवर आमदारपदी निवडून आले आहेत. ठाकरे कॅबिनेटमध्ये त्यांच्यावर फलोत्पादन आणि रोजगार हमी विभागाचे मंत्री आहेत.