पुणे – भाजपने मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत यश मिळवले. यानंतर पक्ष्ाच्या वतीने शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या नेतृत्वाखाली आनंदोत्सव साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर जगाने शिक्कामोर्तब केले आहे . केंद्रातील भारतीय जनता पार्टी सरकार हे जनतेचे सरकार आहे. तीन राज्यांतील विजय ही लोकसभा विजयाची नांदी आहे, असे घाटे म्हणाले.
यावेळी कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत ढोल ताशांच्या गजरात जल्लोष केला. यावेळी घाटे यांच्यासह पुणे भाजपा प्रभारी माधव भांडारी, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, प्रदेश सचिव वर्षा डहाळे, युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस सुशील मेंगडे, कसबा निवडणूक प्रमुख हेमंत रासने, पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, वर्षा तापकीर, रवींद्र साळेगावकर, राहुल भंडारे, उपाध्यक्ष प्रमोद कोंढरे, प्रिया शेंडगे, गायत्री खडके, राजेंद्र काकडे, गणेश बगाडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.