मुंबई – सध्या विकी कौशल त्याचा आगामी चित्रपट ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अशात या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान विक्कीने कतरिना सोबत डेटिंग आणि नात्याबद्दल पहिल्यांदा कोणाला सांगितले याबाबत खुलासा केला आहे. विकीला विचारण्यात आले की, तो पहिल्यांदाच घरात कतरिनासोबतच्या नात्याबद्दल कोणाशी बोलला होता ? यावर त्याने खुलासा केला आहे.
यावर प्रतिक्रिया देताना विकीने सांगितले की, तो कतरिनाला डेट करत असल्याचे त्याच्या आई आणि वडिलांना पहिल्यांदा कळले होते. याशिवाय तो असेही म्हणाला की, सध्या त्याच्या कुटुंबातील कोणीही त्याला कुटुंब नियोजन करण्यास भाग पाडत नाहीये.
कतरिनासोबतच्या डेटिंगबद्दल मी पहिल्यांदा माझ्या आईला सांगितले होते. मग मी माझ्या वडिलांनाही याबद्दल सांगितले. यानंतर त्याला असेही विचारण्यात आले की, जेव्हा त्याने आपल्या पालकांना सांगितले की तो कतरिनाला डेट करत आहे, तेव्हा त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला का? यावर उत्तर देताना विकी हसत म्हणाला की हो, पालकांना कतरिनाबद्दल वर्तमानपत्रे किंवा सोशल मीडियाद्वारे कळले का? यावरही विकी हसला आणि म्हणाला की नाही, असे वाईट दिवस आले नाहीत की माझ्या आई-वडिलांना सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्याबद्दल काही कळले.
एका प्रोजेक्टवर एकत्र काम करण्याबद्दल बोलताना विकी म्हणाला, मी एकदा कतरिनाशी याबद्दल बोललो होतो. मी तिला सांगितले की मला माहित आहे की आपण एकत्र करत असलेल्या चित्रपटात दोन दिग्दर्शक असतील. एक दिग्दर्शक जो आम्हाला चित्रपटाच्या सेटवर मार्गदर्शन करेल आणि एक दिग्दर्शक जो घरी येईल आणि मला सांगेल की हे योग्य आहे आणि ते योग्य नाही. द ग्रेट इंडियन फॅमिलीनंतर विकी कौशल मेघना गुलजारच्या सॅम बहादूर या चित्रपटात दिसणार आहे.