बंगळुरू – कर्नाटकातील ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक एमएस प्रभाकर यांचे गुरुवारी निधन झाले. ते 87 वर्षांचे होते. प्रभाकर कन्नड साहित्यात ‘कामरूपी’ या नावाने प्रसिद्ध होते. प्रभाकर यांनी कर्नाटकातील कोलार येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. ते काही महिन्यांपासून आजारांशी झुंज देत होते. प्रभाकर आयुष्यभर अविवाहित राहिले. त्यांचा मृतदेह एमएस रामय्या हॉस्पिटलला दान करण्यात आला आहे.
एमएस प्रभाकर हे गुवाहाटी विद्यापीठात इंग्रजीचे शिक्षक होते. त्यांनी जवळपास चार दशके पत्रकार म्हणून काम केले. ते त्यांच्या साहित्यिक लेखनासाठी प्रसिद्ध होते. प्रभाकर त्यांच्या एका संग्रहाने कन्नड साहित्यात प्रसिद्ध झाले. ‘कुदुरे मोटे’ या कन्नड कादंबरीसाठी त्यांना कर्नाटक साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे.