वाघोली -लोणीकंद पोलिसांनी वाघोली-केसनंद रस्त्यावर केलेल्या कारवाईत तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडून 4 वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन तर लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक अशा एकूण चार दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. केसनंदहून वाघोलीच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीवर तीन अल्पवयीन मुले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
यावेळी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता दुचाकी चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्यांनी चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चार दुचाकी चोरल्या असल्याचे कबूल केले.