वाहन विक्री वाढली

उत्सवाबाबत वाहन कंपन्या आशावादी

नवी दिल्ली- सप्टेंबर महिन्यात बऱ्याच वाहन कंपन्यांची विक्री वाढली असल्यामुळे वाहन क्षेत्र उत्सवाच्या काळाबाबत आशावादी झाले आहे.

मारुती सुझुकी कंपनीने सप्टेंबर महिन्यात 1 लाख 60 हजार कार विकल्या. गेल्या वर्षाच्या या महिन्यातील विक्रीच्या तुलनेत ही वाढ 31 टक्‍के आहे. कंपनीच्या देशांतर्गत विक्रीत 32 टक्‍के तर निर्यातीमध्ये 9 टक्‍के वाढ झाली. याचा अर्थ देशांतर्गत परिस्थिती अधिक चांगली झाली आहे.

एस्कोर्ट ट्रॅक्‍टर कंपनीने सप्टेंबर महिन्यात 11 हजार 800 ट्रॅक्‍टर विकले. ही वाढ 9 टक्‍के आहे. महिंद्रा कंपनीच्या ट्रॅक्‍टर विक्रीत 17 टक्‍के वाढ होऊन या कंपनीने एप्रिल महिन्यात 43 हजार 300 ट्रॅक्‍टर विकले.

भारतीय बाजारपेठेत नव्याने आलेल्या किया मोटर्सने सप्टेंबर महिन्यात 18 हजार 600 कार विकल्या. गेल्या वर्षीच्या यात तुलनेत दुपटीने वाढ झाली आहे. ह्युंदाई कंपनीच्या सप्टेंबरमधील विक्री 4 टक्‍क्‍यांनी वाढ होऊन या कंपनीने 59 हजार 900 कार विकल्या.

बजाज ऑटोच्या वाहन विक्रीत सप्टेंबर महिन्यात 10 टक्‍के वाढ होऊन या कंपनीने सप्टेंबर महिन्यामध्ये 4 लाख 41 हजार वाहने विकली. स्कोडा ऑटो इंडियाच्या विक्रीत 7 टक्‍क्‍यांनी वाढ होऊन या कंपनीने 1,300 वाहने विकली.

काही कंपन्यांच्या विक्रीत घट

एमजी मोटर्सच्या विक्रीत सप्टेंबर महिन्यात 3 टक्‍क्‍यांची घट झाली. या कंपनीने 2 हजार 500 वाहने विकली. टोयोटो मोटार किर्लोस्कर कंपनीच्या विक्रीत सप्टेंबर महिन्यात 20 टक्‍क्‍यांची घट होऊन या कंपनीने 8 हजार 100 वाहने विकली. महिंद्रा कंपनीच्या वाहन विक्रीत 17 टक्‍क्‍यांची घट होऊन या कंपनीने 35 हजार 900 वाहने विकली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.