डॉ. लक्ष्मी जे. यांनी मोशीजवळील चिंबळी फाटा येथे वसुंधरा मल्टिस्पेशालिस्ट डायबेटिस सेंटर आणि आयसीयू 2019 मध्ये सुरू केले. तेव्हा अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. मुळात हॉस्पिटल उभारणे, रुग्णांमध्ये विश्वास संपादन करणे, त्यांची सुश्रुषा करणे, तसेच हॉस्पिटल उभारण्याचे कारण येथील लोकांना व आजूबाजूच्या लोकांना तसेच गरोदर महिलांना रात्रीच्यावेळी अचानक हॉस्पिटलमध्ये चाकण किंवा भोसरी येथेजावे लागते. त्यामुळे डॉ. लक्ष्मी यांनी चिंबळी फाटा या ठिकाणी आयसीयू डिलिव्हरी तसेच मधुमेह आजारावरील ताबडतोब उपचार व्हावेत, म्हणून हॉस्पिटल सुरू केले.
हे हॉस्पिटल सुरू करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. हॉस्पिटल अशा ठिकाणी सुरू केले, कारण पेशंटला शांतता, सुखसोयी मोठे पार्किंग मिळाले पाहिजे. तसेच लोकांना मधुमेहाबद्दल जास्त माहिती नसल्यामुळे, त्यांना सल्ला तसेच मधुमेहाची ट्रिटमेंट कमी किमतीमध्ये उपलब्ध करून देण्याचे ठरवले. तसेच थायरॉईडबद्दल माहिती तसेच उपचार सवलतीमध्ये करून देण्यात येईल.
डॉ. लक्ष्मी यांनी यापूर्वी डिलिव्हरी, मधुमेहावरील उपचार व याचा अनुभव मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये घेतला आहे. मोशी या ठिकाणी डॉ. लक्ष्मी यांनी छोटे क्लिनिक चालू केले. त्यावरून त्यांना समजले की, येथील लोकांना मोठ्या हॉस्पिटलची सर्व सुखसोयींची गरज आहे.
हॉस्पिटल सुरू करताना चिंबळी गावातील सरपंच रेश्मा सोनवणे यांनी तसेच उद्योजक रविंद्र जैद यांचे सहकार्य असल्याने हॉस्पिटल सुरू करताना डॉ. लक्ष्मी यांना खूप मदत झाली. तसेच डॉ. लक्ष्मी यांना हॉस्पिटल उभारण्यात यश आले. हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये ऑक्सिजन, व्हेंटीलेटर आणि इतर मशीन यांची सोय करण्यात आली.
या ठिकाणी अद्ययावत सुविधांसह मोठे ऑपरेशन थिएटर उभारण्यात आले. रुग्णांच्या आवश्यकतेनुसार आयसीयू, सेमी रुम, स्पेशल रुम अशा सुविधा येथे उपलब्ध आहेत. तसेच हॉस्पिटलमध्ये मेडिकल 24 तास उपलब्ध ठेवण्यात आले आहे. हॉस्पिटल 30 बेडचे केले असून, डिजिटल एक्स-रे, तज्ज्ञ डॉक्टर वेळोवेळी उपलब्ध राहतील, अशी काळजी हॉस्पिटल प्रशासनाकडून घेण्यात आली आहे.