कानपूर – बॉलिवूड अभिनेता ‘वरून धवन’ सध्या त्याच्या आगामी ‘बावल’ या चित्रपटाच्या शूटिंग मध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात वरून सोबत अभिनेत्री जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत झळकणार आहे. विशेष म्हणजेच, या चित्रपटात यावरून आणि जान्हवी पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करत आहे.
उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये ‘बावल’ चित्रपटाचे शूटिंगही सुरू झाले आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते नितीश तिवारी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. साजिद नाडियाडवाला प्रॉडक्शन बॅनरचा हा चित्रपट आहे.
कानपुर यातायात पुलिस ने शूटिंग में नियमों के उल्लंघन को लेकर काटा #VarunDhawan का चालान, डीसीपी ट्रैफ़िक संकल्प शर्मा pic.twitter.com/wCp2aXHFW0
— NBT Entertainment (@NBTEnt) April 16, 2022
कानपूर येथील विविध भागांमध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण केलं जाणार आहे. ‘बवाल’ चित्रपटात वरुण धवन शिक्षकाची भूमिका साकारत आहे. दरम्यान, चित्रपटात प्रदर्शित होणयापूर्वीच मोठी अडचण समोर आली आहे. शुक्रवारी या चित्रपटातील चित्रीकरणाचा एका व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये वरुण चित्रीकरण करताना रस्त्यावर बुलेट चालवताना दिसत आहे. मात्र याच गोष्टीमुळे अभिनेत्यावर कारवाई करण्यात आली आहे.
कानपुर में #VarunDhawan पर ट्रैफ़िक नियमों के उल्लंघन का आरोप, यातायात पुलिस ने video फ़ुटेज को आधार बनाकर काटा चालान pic.twitter.com/o8rI3FlTTR
— NBT Entertainment (@NBTEnt) April 16, 2022
वरुण धवनच्या या कृतीमुळे कानपूर येथील वाहतूक पोलिसांनी त्याच्यावकर कायदेशीर कारवाई केली आहे. कारण वरुणनं कानपूरमध्ये रस्त्यावर बुलेट चालवताना हेल्मेट घातले नव्हते. त्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई झाल्यानंतर वरुणचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.