वाराणसी – भाजपच्या नेत्याच्या कार्यालयाच्या अवैध बांधकामावर आज जिल्हा प्रशासनाच्यावतीने बुलडोझरची कारवाई करण्यात आली. या कार्यालयाच्या अवैध बांधकामाबद्दल एका महिलेने जिल्हा प्रशासनाकडे तक्रार केली होती. तसेच दोन दिवसांपूर्वी या अवैध बांधकामाबद्दल आंदोलनदेखील करण्यात आले होते.
सत्यप्रकाश सिंह उर्फ अखंड सिंह असे कारवाई झालेल्या नेत्याचे नाव आहे. ते भाजपचे जिल्हा उपाद्यक्ष असून सिकरौल येथील वरुण एन्क्लॅव्ह सोसायटीच्या जागेवर अतिक्रमण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. वाराणसी विकास प्राधिकरणाच्या उपाध्यक्षांच्या आदेशानंतर स्थानिक पोलीस आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या अतिक्रमणावर बुलडोझर चालवण्यात आला. या अवैध बांधकामाची प्रत्यक्ष पहाणी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.