नवी दिल्ली – वंदे भारत ट्रेनची स्लीपर (Vande Bharat Sleeper Train) आवृत्ती पुढील वर्षी मार्चपर्यंत देशातील रुळांवर धावताना दिसेल. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या ट्रेनच्या संकल्पनेची 7 छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर करताना कॅप्शनमध्ये “वंदे भारतचे स्लीपर व्हर्जन 2024 च्या सुरवातीला येत आहे,’ असे लिहले आहे.
जागतिक दर्जाच्या वैशिष्ट्यांसह आणि टियर कोचमध्ये छतावरील प्रकाश आणि बर्थमध्ये चढण्यासाठी 5-पायऱ्यांची शिडीदेखील असेल. पुढील वर्षी 10 वंदे भारत स्लीपर ट्रेन धावण्याची शक्यता आहे. देशात सध्या चेअर कारची सुविधा असलेली वंदे भारत सुरू आहे.
राजधानी एक्सप्रेसच्या मार्गावर आता वंदे भारत ट्रेन चालवण्याची रेल्वेची योजना आहे. अशा स्थितीत रात्रीच्या वेळी प्रवाशांना विश्रांती देण्यासाठी स्लीपर कोच उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
वंदे भारतची नॉन-एसी ट्रेन आवृत्तीही सुरू करण्याची योजना आहे. या वर्षी 31 ऑक्टोबरपूर्वी लॉन्च केले जाईल. ही एक नॉन-एसी पुश-पुल ट्रेन असेल, ज्याच्या दोन्ही बाजूला 22 डबे आणि एक लोकोमोटिव्ह असणार आहे.