वडगाव मावळ – मावळ तालुक्यातील रिक्त असलेल्या वडगाव मावळ, तळेगाव दाभाडे या शहरांसह 47 गावच्या पोलीस पाटील पदांची नियुक्ती प्रक्रिया सुरू झाली आहे. त्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत नुकतीच काढण्यात आली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मावळ तालुक्यातील 47 व व मुळशी तालुक्यातील 49 अशी एकूण 96 रिक्त असलेल्या पोलीस पाटील भरतीप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार, संबंधित पदांची आरक्षण सोडत बावधन येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय, पुणे विभागीय महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी याठिकाणी काढण्यात आली.
आरक्षण व गावांची नावे पुढीलप्रमाणे
1) अनुसूचित जाती : वडगाव मावळ, चांदखेड, शिळाटणे,2) अनुसूचित जाती महिला : खडकाळा, सोमाटणे, कुसगाव बु, तळेगाव दाभाडे, भुशी, 3) अनुसूचित जमाती : तुंगार्ली, नवलाख उंब्रे, वडेश्वर, दुधीवरे, 4) अनुसूचित जमाती महिला : वलवण, कोळे चाफेसर, कुणे नामा,5) विशेष मागास प्रवर्ग : कडधे, मंगरूळ, 6) विमुक्त जाती : मालेवाडी,7) विमुक्त जाती महिला : डोणे, 8) भटक्या जमाती (ब) : कुसगाव खुर्द, खामशेत, पानसोली, 9) भटक्या जमाती (क): आपटी, आतवण, तुंग, 10) भटक्या जमाती (ड) : जांबवडे, करूंज, शिरे,11) भटक्या जमाती (ड) महिला : बेडसे, 12) इतर मागास प्रवर्ग : दारुंब्रे, 13) इतर मागास प्रवर्ग महिला : कुसगाव पमा, कातवी, आंबी, पाचाणे, 14) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक : माजगाव, 15) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक महिला : बोरवली, आंबेगाव, 16) सर्वसाधारण: सदापूर, बोरज, येळसे, महागाव, गेव्हडे आपटी, भडवली, घोणशेत, 17) सर्वसाधारण महिला : ब्राम्हणवाडी, राकसवाडी, वेल्हवेळी.
वडगाव, तळेगाव अनुसूचित जातीकरिता राखीव
या आरक्षण सोडतीमध्ये तालुक्यातील वडगाव मावळ, तळेगाव दाभाडे, चांदखेड व सोमाटणे या तीन महत्वाच्या गावांचा समावेश होता. यापैकी वडगाव मावळ व चांदखेडला अनुससूचित जातीचे तर तळेगाव दाभाडे व सोमाटणेकरिता अनुसूचित जाती महिलाचे अीाण पडले आहे. त्यामुळे या गावांची पाटीलकी आता मागास प्रवर्गाकडे असणार आहे.