वॉशिंग्टन – अमेरिकेत ऑक्टोबर अर्थात पुढच्याच महिन्यात करोना विरोधी लशीचे वितरण सुरू केले जाण्याची शक्यता असल्याचा दावा त्या देशाचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.
याबाबत बोलताना ट्रम्प म्हणाले की आम्ही अगदी सुरक्षितपणे पाउले उचलत आहोत. अमेरिकेत पुढच्याच महिन्यात लस वितरीत केली जाउ शकते आणि 2020 वर्षाच्या अखेरपर्यंत किमान शंभर कोटी लोकांना लस दिली जाण्याची शक्यता आहे. अत्यंत प्रभावीपणे लस वितरीत केली जाईल व आम्ही योग्य मार्गावर आहोत.
थोडा वेळ लागेल, पण आपण सगळे सेटल होउ असा दावा करतानाच अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील त्यांचे प्रतिस्पर्धी ज्यो बायडेन यांच्यावरही ट्रम्प यांनी टीका केली. बायडेन आणि त्यांच्या पक्षाच्या लशीच्या विरोधातील नकारत्मक सूर बंद करायला हवा असे त्यांनी म्हटले आहे.