नवी दिल्ली – तंत्रज्ञान जसजसे प्रगती करत आहे, तसतसे काही गुंतागुंतीच्या समस्यांवर उपायही निघत आहेत. जर तुम्ही तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स घरी विसरला असाल आणि गाडी चालवताना पोलिसांनी तुमची तपासणी केली, तर ट्रॅफिक पोलिस तुमचे चलन फाडणार नाहीत. वास्तविक, आता तुमच्याकडे असा पर्याय आहे, ज्यामुळे तुम्ही तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्सची हार्ड कॉपी न ठेवताही ट्रॅफिक चालन टाळू शकता. तुम्हाला फक्त तुमच्या स्मार्टफोनची गरज आहे.
डिजिलॉकर अॅप हा उपाय –
तुमच्यापैकी काहींना डिजिलॉकरबद्दल माहिती असेल. हे अॅप तुमची कागदपत्रे स्कॅन करून सुरक्षित ठेवते. हे एक सरकारी मान्यताप्राप्त अॅप आहे, ज्यावर तुम्ही आता तुमचे आधार कार्ड, जन्म प्रमाणपत्र, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स आणि तुमच्या वाहनाशी संबंधित इतर कागदपत्रांसह सरकारी कागदपत्रे देखील सुरक्षित ठेवू शकता, जे सहसा पोलिसांकडून तुम्हाला तपासणी दरम्यान दाखवावे लागतात.
तुम्हाला फक्त तुमच्या स्मार्टफोनवर डिजी लॉकर अॅप उघडायचे आहे आणि ही कागदपत्रे दाखवायची आहेत. त्यानंतर तुमचे चलन कापले जाणार नाही. जर तुम्हाला अद्यापपर्यंत याबाबतची माहिती नसेल तर आता तुमच्याकडे या समस्येवर सर्वोत्तम उपाय आहे, कारण आजकाल सर्वच लोक स्मार्टफोन वापरतात. त्यामुळे तुम्हीही डीजी लाॅकर हे अॅप डाऊनलोड करून तुमची आवश्यक कागदपत्रे त्यात अपलोड करू शकता.