नवी दिल्ली – अमेरिकेने (US) चीनमधील 3 कंपन्यांवर (ban Chinese companies) निर्बध घातले आहेत.पाकिस्तानला (Pakistan) क्षेपणास्त्रांचे सुटे भाग पुरवल्याचा ठपका या तिन्ही कंपन्यांवर ठेवण्यात आला आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्यावतीने ही माहिती देण्यात आली. (US restrictions Chinese companies)
जनरल टेक्नोलॉजी लिमिटेड, बीजिंग लुओ टेक्नोलॉजी डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड आणि चांगझाऊ युटेक कंपोझिट कंपनी लिमिटेड अशी या कंपन्यांची नावे आहेत. घातक शस्त्रनिर्मितीच्या पाकिस्तानच्या (Pak) कार्यक्रमामध्ये या कंपन्यांनी सहभाग घेतल्याचा ठपका अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने ठेवला आहे.
या तिन्ही कंपन्यांनी पाकिस्तानला (Pakistan) ब्रेझिंग मटेरियल, सॉलिड-प्रोपेलंट रॉकेट मोटर्सच्या उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या मॅंडरेल्स आणि डी-ग्लास ग्लास फायबर, क्वार्टज फॅब्रिक, पुरवण्यासाठी काम केले आहे. या सर्वांचा क्षेपणास्त्र (missiles) प्रणालींमध्ये वापर केला जातो आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे.
अमेरिकेने चीनमधील 3 कंपन्यांवर निर्बध घातल्याचे समजताच देशभरातील इतर यंत्रणा देखील अलर्ट झाल्याचे समजते. आंतरराष्ट्रीय बाजार पेठांवर याबाबतचा कितपत परिणाम होणार हे आत्ताच सांगणं कठीण आहे. पाकिस्तानसह इतर देश आता यावर काय प्रतिक्रिया देतात याकडे अनेक देशाचं लक्ष आहे.