वॉशिंग्टन – अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी काल रात्री जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांचे व्हाईट हाऊसमध्ये स्वागत केले. इंडो-पॅसिफिक प्रदेशात चीनच्या वाढत्या आक्रमकतेबद्दलच्या समान तक्रारीमध्ये दोन नेते द्विपक्षीय संबंधांना अधिक चालना देण्याचा प्रयत्न करत आहेत.
दोन्ही नेते जपानमध्ये अमेरिकेच्या लष्करी तळाची पुनर्रचना करण्याचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. हा निर्णय झाल्यास अमेरिका आणि जपान दरम्यानच्या संरक्षण सहकार्यात १९६० नंतर सर्वात मोठी प्रगती झालेली असेल.
किशिदा हे २०१५ मध्ये शिन्झो आबे नंतर अमेरिकेच्या अध्यक्षांकडून पूर्ण सन्मान प्राप्त करणारे पहिले जपानी नेते ठरले. किशिदा आणि त्यांच्या पत्नी युकोसह काल रात्री व्हाईट हाऊसमध्ये आले. देशांसोबतचे संबंध दृढ करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून बायडेन यांनी जपानच्या पंतप्रधानांना भोजनासाठी आमंत्रित केले आहे.
उद्या बायडेन आणि किशिदा यांच्यात द्विपक्षीय चर्चा होण्याची शक्यता आह. दक्षिण चीन समुद्रातील चीनच्या घुसखोरीच्या मुद्यावर फिलिपाईन्सकडूनही अमेरिकेपुढे कैपियत मांडली गेली असून या मुद्यावर जपान आणि फिलिपाईन्सला अमेरिकेकडून संरक्षणाची ग्वाही दिली जाण्याचीही शक्यता आहे.