नवी दिल्ली: अमेरिकेने भारताला दोनशे व्हेंटिलेटर्स देण्याची घोषणा केली होती. त्यातील पहिली शंभर व्हेटिलेटर्सची बॅच भारताच्या हवाली करण्यात आली आहे. करोना विरोधातील लढाईत मदत म्हणून ही मदत देण्यात आली आहे.
भारताच्या वतीने भारतीय रेडक्रॉस संघटनेचे सरचिटणीस आर. के. जैन यांनी हे व्हेंटिलेटर्स स्वीकारले. या उपकरणाचा कोविडमुळे गंभीर आजारी असलेल्या रुग्णाला लाभ होणार आहे. ही अतिशय उच्च तंत्रज्ञानाची मशिन्स आहेत. भारतासाठी ती अत्यंत उपयुक्त आहेत.
अमेरिकेने भारताला कोविडशी लढण्यासाठी या आधीच 5.9 दशलक्ष डॉलर्सची आर्थिक मदतही दिली आहे. सार्वजनिक आरोग्य आणि कोविड उपचारासाठी हा निधी वापरण्यासाठी भारताला हा निधी अमेरिकेने दिला आहे. दरम्यान, उर्वरित शंभर व्हेंटिलेटर्सची मदतही लवकरच दिली जाणार आहे.