पिंपरी (प्रतिनिधी) – सांगवी फाटा येथील जिल्हा रुग्णालयात करोनाने मंगळवारी (दि. 16) बोपोडी येथील 56 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. त्याशिवाय, आज नव्याने आणखी सहा जण करोनाबाधित झाले आहेत. सांगवी, दापोडी आणि औंध येथील हे रुग्ण आहेत. करोनाबाधितांमध्ये 2 पुरुष, 2 महिला, 17 वर्षीय मुलासह 8 वर्षीय मुलीचा समावेश आहे.
सांगवी येथील एकाच कुटुंबातील तिघे करोनाबाधित झाले आहेत. त्याशिवाय, औंध येथील एकाच कुटुंबातील दोघांच्या करोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
दापोडी येथील 17 वर्षाच्या मुलाला देखील करोनाची लागण झाली आहे. बोपोडी आणि नवी सांगवी येथील अनुक्रमे 51 वर्षीय पुरुष आणि 29 वर्षीय तरुणी करोनामुक्त झाली. सध्या रुग्णालयात 23 जणांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 5 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.