बॉलिवूड अभिनेत्री आणि ब्यूटी क्वीन उर्वशी रौटेलाने सोशल मीडियावर एक मजेदार पोस्ट शेअर केली आहे. त्यात ती म्हणते की, तिचा बॉयफ्रेंड “फेब्रुवारी 30′ सारखा आहे. उर्वशीने इंस्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो पोस्ट केला, त्यात ती एकापिंक स्वेटशर्ट आणि ब्ल्यू जीन्समध्ये दिसत आहे.
या फोटोसोबत ती लिहिते की, माझा बॉयफ्रेंड फेब्रुवारी महिन्यातील 30 तारखेसारखा आहे. ज्याचे काही अस्तित्वच नाही. यासाबेतच तिने पुढे लिहिले आहे की,”व्हर्जिन भानुप्रिया’ 16 जुलैला प्रदर्शित होत आहे. ट्रेलरला दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल तिने चाहत्यांचे आभार मानले आहे.
“ग्रेट ग्रॅंड मस्ती’ या सिनेमात रितेश देशमुख, अफताफ शिवदासानीआणि विवेक ओबेराय या स्टारकास्टसह उर्वशीने आपल्या अभिनयाचीछाप सोडली होती. या चित्रपटानेच तिची बोल्ड इमेज निर्माण केली होती. तिच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक केले गेले होते.आता प्रदर्शित होत असलेल्या “व्हर्जिन भानुप्रिया’ यात गौतम गुलाटी,अर्चना पूरन सिंह, डेलनाज इरानी, राजीव गुप्ता, बृजेंद्र काला, निकी अनेजा वालिया आणि रुमाना मोला हे कलाकार आहेत.