उर्वशी रौतेला तिच्या फॅशन टिप्स आणि मॉडर्न आउटफिट, ग्लॅमरस लुकसाठी प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या फॅशन फेस्टिव्हलमध्ये तिच्याकडून नवीन फॅशन ट्रेन्ड प्रस्थापित केले जात असतात. अलिकडेच एका अरब फॅशन वीकमध्ये तिच्या गेटअपवर सर्वांच्याच नजरा खिळलेल्या होत्या.
View this post on Instagram
उर्वशीने या फॅशन फेस्टिव्हलमधील काही व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर देखील केले आहेत.उर्वशी रौतेलाने सांगितले की ती पहिली भारतीय अभिनेत्री आहे जी या मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकली आहे.
View this post on Instagram
या फोटोशूटमध्ये उर्वशी एका ऑरेंज गाउन आणि रेड ड्रेसमध्ये दिसते आहे.यातील तिचा रेड रंगाचा गाउन २५ लाख रुपयांचा होता आणि ऑरेंज गाउनची किंमत २५ लाखांहून जास्त असल्याचे सांगितले जात आहे.
View this post on Instagram
@Soularabiaofficial च्या कव्हर फोटोवर येणारी पहिली एशियाई आणि भारतीय अभिनेत्री आहे.पुढे उर्वशीने लिहिले की, स्वप्न खरी होतात, पण तेव्हा जेव्हा तुम्ही ती पुर्ण करण्यासाठी खूप प्रयत्न करतात. उर्वशी रौतेलाने नुकतेच अरबच्या प्रसिद्ध मासिक सोलच्या कव्हर पेजसाठी फोटोशूट केले आहे ज्यात ती खूप ग्लॅमरस दिसते आहे.
यापूर्वीही तिने फॅशन फेस्टिव्हलमधील काही व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर देखील केले होते . त्यामध्ये तिने चक्क 24 कॅरेट सोन्याचे आय शॅडो बसवल्याचे दिसते आहे. स्वतः उर्वशीने हे अस्सल सोन्याचे आय शॅडो असल्याचे व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये सांगितले आहे. तिच्या या व्हिडीओवर प्रेक्षकांनीही खूप प्रतिक्रिया दिल्या आहेत.
View this post on Instagram
दरम्यान, महागड्या आउटफिटमुळे उर्वशी चर्चेत आली होती. नेहा कक्कडच्या लग्नमध्ये उर्वशी चक्क 55 लाख रुपयांचा लहंगा परिधान केला होता. काही दिवसांपूर्वी ती “व्हर्जिन भानुप्रिया’ मधील लीड रोल केला होता. याशिवाय “ब्लॅक रोज’या तेलगू सिनेमातही काम करणार आहे.