उरवडे आग प्रकरण; कंपनीच्या मालकाला न्यायालयीन कोठडी

पुणे – मुळशी तालुक्‍यातील उरवडे येथील एका रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत 17 कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याप्रकरणी पौड पोलिसांनी अटक केलेल्या कंपनीच्या मालकाची रवानगी न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत केली आहे.

निकुंज शहा ( वय 39 रा. सहकारनगर) असे मालकाचे नाव आहे. त्याचा दुबईत असलेल्या भाव केयुर आणि वडील बिपीन जयंतीलाल शहा ( वय 68 रा .सहकारनगर) या दोघांवर गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी पौड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी फिर्याद दिली आहे.

7 जून रोजी एस.व्ही अकवा कंपनीला आग लागून त्यात 17 कामगारांचा होळपळून मृत्यू झाला आणि 5 कामगार गंभीर जखमी झाले. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने पोलिसांनी निकुंज याला न्यायालयात हजर केले. त्यावेळी सरकारी पक्षातर्फे पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी करण्यात आली. यास बचाव पक्षातर्फे ऍड. हर्षद निंबाळकर आणि ऍड. सत्यम निंबाळकर यांनी विरोध केला. तपास अधिकाऱ्याला तपास करण्यास पुरेसा वेळ मिळाला आहे.

पोलीस कोठडीस दाखविण्यात आलेली जुनीच कारणे असल्याचा युक्तीवाद बचाव पक्षातर्फे करण्यात आला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.