पुन्हा टेन्शन ! करोनाच्या नवीन व्हेरियंटसंदर्भात ICMR कडून महत्त्वपूर्ण अलर्ट

नवी दिल्ली – देशात करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातल्यानंतर आता काही प्रमाणात दुसरी लाट ओसरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेक शहरांमध्ये अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याचवेळी करोनाच्या तिसऱ्या लाटेची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यात आता टेन्शन वाढवणारे वृत्त असून करोनाचा नवीन व्हेरियंट डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

करोनाचं डेल्टा (Deltta) व्हेरियंट आलं असून हे सर्वाधिक घातक व्हेरियंट असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे या व्हेरियंटपासून बचाव करण्यासाठी ICMR कडून सूचना देण्यात आल्या आहेत.

करोना व्हायरसच्या ‘Delta ‘ व्हेरियंटकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. 28 प्रयोगशाळांमध्ये या व्हेरिएंटवर संशोधन सुरू आहे. हे व्हेरियंट किती धोकादायक आहे यावर शोध सुरु आहे. मात्र या व्हेरियंटचे रुग्ण कमी प्रमाणात आहेत. त्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही असं ICMR कडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान करोनाच्या डेल्टा व्हेरियंटवर मात करण्यासाठीचं शस्त्र नाही. मात्र करोना नियम पाळल्यास यापासून बचाव करण्यात येऊ शकतो, असं डॉक्टर विनोद कुमार पॉल यांनी म्हटलं आहे. या नव्या व्हेरियंटला रोखायचं असेल तर मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग आणि कंटेन्मेंट झोन तयार करणे तसेच अधिकाधिक लसीकरण आवश्यक असल्याचं, आयसीएमआरने म्हटलं आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.