मुंबई – आपल्या कपड्यामुळे सतत चर्चेत असणाऱ्या उर्फी जावेदचा नवा अवतार मीडियाला पाहायला मिळाला आहे. उर्फी पुन्हा तिच्या लेटेस्ट बोल्ड लूकने मीडियासमोर आली आहे. यादरम्यान असे काही घडले की उर्फी मीडियावर जोरात ओरडू लागली. तिचा आवाज इतका वाढलं होता की तिथे उपस्थित सर्वजण गप्प बसले होते. उर्फीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
उर्फीने एका कार्यक्रमासाठी हजेरी लावली होती. यावेळी तिच्या स्टाइलवरून कोणीतरी हळूच कमेंट पास केली. यावरून उर्फी चांगलीच भडकली. उर्फीने यावेळी मोबाईलवर व्हिडीओ दाखवत एका मीडियाकर्मीचा आवाज ऐकवला. ज्यात ती व्यक्ती ‘आज ढंगके कपडे पेहन के आयी है’ असं बोलत असतानाच आवाज ऐकायला मिळतो. त्यावरून उर्फीने सर्वांना हा आवाज कोणाचा आहे असा जाब विचारला. यावेळी उर्फीचा आवाज चांगलाच वाढल्याचे दिसून आले. तसेच जर कोणाला कपड्यांवरून कमेंट करायची असेल तर त्याने आपल्या आईच्या आणि गर्लफ्रेंडच्या घरी जाऊन करावी माझ्या कपड्यांवर कोणी कमेंट नाही करायची असा दम उर्फीने यावेळी दिला.
View this post on Instagram
उर्फी जावेदच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर ती पुन्हा एकदा तिच्या कपड्यांमुळे चर्चेत आली आहे. यादरम्यान तिने हिरव्या रंगाचा बॅकलेस ड्रेस परिधान केला होता, तिचा हा लूक मर्यादेपेक्षा जास्त बोल्ड दिसत आहे. मात्र झालेल्या प्रकारामुळे उर्फी चिडचिड करताना दिसली. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे.