मुंबई – मॉडेल आणि अभिनेत्री उर्फी जावेदचा राजकीय वाद समोर आल्यानंतर तिने आपला अतरंगी बोल्ड अवतार कमी केला की काय असा प्रश्न अनेक दिवसांपासून चाहत्यांना पडला होता. कारण बऱ्याच दिवसांपासून उर्फी तिच्या पहिल्या अतरंगी अंदाजांप्रमाणे फॅशन करताना दिसत नव्हती. मात्र आता उर्फीचा पुन्हा एकदा असाच अतरंगी पणा समोर आला आहे. उर्फीच्या नव्या ड्रेसवरून तिच्यावर नेटकऱ्यांनी टीका करायला सुरुवात केली आहे.
उर्फी जावेदचा एक नवा लूक समोर आला आहे. ज्यामध्ये ती केवळ गजरा परिधान केलेली दिसून येत आहे. उर्फीने स्वतःच्या अधिकृत इंस्टाग्रामवरून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तिचा हा नवा लूक पाहायला मिळतोय. यावेळी उर्फीला नेटकऱ्यांनी पुन्हा धारेवर धरायला सुरुवात केली आहे.
समोर आलेल्या व्हिडिओमध्ये उर्फीने आपल्या हातांनी शरीर झाकण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे यावेळी तिने आपले उर्वरित शरीर फुलांच्या गजऱ्याने कव्हर केले आहे. उर्फीच्या या अतरंगी पणामुळे अनेकांनी तिला केवळ ट्रोलचं नाही तर कमेंट करून अनफॉलो करत असलयाचे म्हंटले आहे.
View this post on Instagram
नुकतच अभिनेत्री करीना कपूरने उर्फीचे तिच्या फॅशनबद्दल कौतुक देखील केले होते. यानंतर सर्वांना उर्फी आता फॅशनच्या नावाखाली काहीही परिधान करणार नाही असं वाटत होत मात्र अनेकांचा उर्फीच्या या व्हिडीओमुळे भ्रमनिरास झाला. नेटकऱ्यांनी उर्फीला कमेंट करत चांगलेच खडसावले आहे. ही कधीच सुधारणार नाही अशी कमेंट एका युजरने केली आहे. तर दुसऱ्याने शरीर दाखवून पैसे कमावण्यापेक्षा भीक माग असा सल्ला दिला आहे.