पुणे – शहरातील दहा रुग्णालयांतील शहरी गरीब योजना बंद करण्यात आली असून, यामध्ये शहरातील विविध भागातील मोठ्या रुग्णालयांचा समावेश आहे.
केंद्र सरकारची “महात्मा फुले जन आरोग्य योजना’ आणि महापालिकेची “शहरी गरीब योजना’ अशा दोन्ही योजना सुरू असल्याने त्याचे “डुप्लिकेशन’ होते, असे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. अनेक नागरिक दोन्ही योजनांचा लाभ घेतात. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे या दहा रुग्णालयांमध्ये महापालिकेने स्वत: सुरू केलेली योजना बंद करण्यात आली आहे.
शहरी गरीब योजना बंद केलेली रुग्णालये
औंधएम्स रुग्णालय
कात्रजभारती रुग्णालय
कोथरूडदेवयानी रुग्णालय
कर्वे रस्तागॅलॅक्सी रुग्णालय
बालाजीनगरपवार मल्टिस्पेशालिटी रुग्णालय
बिबवेवाडीराव नर्सिंग होम
खराडीश्री रुग्णालय
कसबा पेठसह्याद्री सूर्य रुग्णालय
हडपसरएच. व्ही. देसाई रुग्णालय
फुरसुंगीशिवम मल्टिस्पेशालिटी रुग्णालय