पुणे : कोरोनाच्या युद्धात पोलीस फौजदारास वीरमरण

पुणे : फरासखाना पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस फौजदाराचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सूर असताना त्यांना वीरमरण प्राप्त झाल्याचे ट्विट पोलीस आयुक्तांनी केले आहे. याच पोलीस ठाण्यातील 8 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातील एक कर्मचारी कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

तर इतर कर्मचाऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरु असून, ठाण्यातील शंभर पोलिसांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. दरम्यान, सदरील कर्मचाऱ्याला घरी असताना कोरोनाची लक्षणे आढळून आली हाती. त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तसेच त्यांना डायबेटीस आणि बीपीचा त्रास होता. त्यांच्यावर उपचार सुरु असताना आज  यांचा मृत्यू झाला आहे.

या घटनेची माहिती झाल्यानंतर पुणे शहर पोलीस दलात  सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याची माहिती मिळाल्यानंतर अतिवरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी यांनी रुग्णालयात धाव घेतली आहे. यावेळी संबंधित पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकाना आणि कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.