UP Vidhan Sabha Bhawan – राजधानी दिल्लीत नवीन संसद भवन झाल्यानंतर आता देशातील सगळ्यांत मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशातही (UP Vidhan Sabha Bhawan) नवीन विधान भवनाची (Vidhan Bhawan) इमारत बांधली जाणार असून त्याकरता 200 एकर जमीन शोधण्याचे काम लखनौ विकास प्राधिकरणाला सोपवण्यात आले आहे.
नवीन विधानभवन कसे असेल याचे रविवारी सादरीकरण करण्यात आले होते. त्यानंतर आता त्याकरता जागा शोधण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी दिले आहेत.
नव्या भवनाच्या जागेसाठी यापूर्वी जो प्रस्ताव देण्यात आला होता, तो योगींनी फेटाळला असून शहराजवळ आणि मोकळ्या ठिकाणाचा शोध घेण्याची सूचना केली आहे.
पार्किंग आणि वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देणे फार अडचणीचे ठरणार नाही याची विशेष खबरदारी घेण्याचे सांगण्यात आले आहे.
सेच जागा किमान 200 एकर असावी असेही निर्देश दिले आहेत. येत्या 25 डिसेंबर रोजी अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती आहे. त्या दिवसाचे औचित्य साधून नव्या वास्तूची कोनशीला ठेवली जावी अशी योगी आदित्यनाथ यांची इच्छा आहे.