गाझियाबाद (उत्तर प्रदेश) – गाझियाबादच्या मुरादनगर भागात शनिवारी रात्री 11 वाजता अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात एका डॉक्टरचा मृत्यू झाला. डीसीपी रवी कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुरादनगर येथील राजवीर वाली गली येथील रहिवासी असलेले डॉ. शमशाद शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास त्यांच्या क्लिनिकमध्ये रुग्णांना भेटत होते.
त्यावेळी अचानक एका अज्ञात व्यक्तीने डॉक्टर शमशाद यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. लोकांनी घाईघाईने डॉक्टर शमशाद यांना रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या हत्येचा हेतु अद्याप समजलेला नाही. मारेकरी मोटारसायकलवर आला होता. त्याच्या सोबत अन्य कोणी होते की नव्हते याची अजून माहिती मिळालेली नाही. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस हल्लेखोराचा माग काढत आहेत.