नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांची तब्येत अत्यंत बिघडली आहे. त्यामुळे त्यांना तातडीने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. बारावीच्या परीक्षेसंदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्रालय निर्णय घेणार असून आज शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल या संदर्भात घोषणा करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. अशातच रमेश पोखरियाल यांच्या प्रकृती अस्वास्थामुळे बारावीच्या परीक्षांसंदर्भातील आज घेतला जाणारा निर्णय लांबणीवर जाऊ शकतो.
मिळालेल्या माहितीनुसार, पोखरियाल यांना कोरोना होऊन केला आहे. तसेच कोरोना नंतरच्या प्रकृतीच्या समस्यांमुळे त्यांना रुग्णालयाच दाखल करण्यात आले आहे.
Union Education Minister Dr Ramesh Pokhriyal Nishank admitted to AIIMS due to post COVID complications today: AIIMS officials
(File pic) pic.twitter.com/w1xMx8xhmt
— ANI (@ANI) June 1, 2021
दरम्यान, डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांच्याकडून आजच सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षांसदर्भात निर्णय घेतला जाणार होता. बारावीच्या परीक्षांबाबत 1 जून रोजी हा निर्णय घेतला जाईल आणि त्याकरता बैठकही घेण्यात येईल असे सांगण्यात आले होते. मात्र, आता डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे बारावीच्या परीक्षांसदर्भात निर्णय घेतला जाणार की नाही, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी 21 एप्रिल रोजी ट्वीट करुन यासंदर्भात माहिती दिली होती की, ते करोना पॉझिटिव्ह आहेत. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करुन घेण्याचे आवाहनही त्यांनी केले होते. तसेच शिक्षण मंत्रालयाचं कामकाज सामान्य स्वरुपात सुरु राहील असेही त्यांनी सांगितले होते .