पुणे – फॅशन मार्केटमध्ये लागलेली आग विझवून घरी जात असताना अग्निशामन दलाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू दुर्दैवी मृत्यू झाला. कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अग्निशमन दलाचे अधीक्षक प्रकाश हसबे यांचे आज अपघाताने निधन झाले.
काल रात्री लागलेल्या फॅशन मार्केटच्या सकाळी आढावा घेऊन हसबे हे घरी निघाले होते. कर्मचाऱ्यांना दोन तासात पुन्हा कामावर परत येतो असे सांगून ते कॅम्प येथून निघाले. येरवडा मार्गावरून जात असताना रस्त्यात त्यांचा अपघात होऊन मृत्यू झाला, अशी माहिती कर्मचारी यांच्याकडून मिळत आहे.
दरम्यान, कॅम्प मधील फॅशन स्ट्रीट भागात शुक्रवारी रात्री आगीने तांडव घातले. या ठिकाणी असलेल्या दुकानांना रात्री 11 च्या सुमारास भीषण आग लागली. आगीची तीव्रता एवढी मोठी होती की लुल्लानगरच्या टेकडी वरून ती दिसत होती. या ठिकाणी कपडे तसेच साहित्याची 500 हुन अधिक दुकाने आहेत.