लॉस एंजेलिस: एखाद्या वस्तूचा काही भाग जर करोना विषाणूच्या संपर्कात आला असेल, तर अल्ट्रा व्हायोलेट एलईडीने त्या पृष्ठभागाचे निर्जंतुकीकरण केले जाऊ शकते, असाआहे. यामुळे निष्कर्श एका अभ्यासाद्वारे काढण्यात आला करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत मिळू शकेल. या संदर्भातील अभ्यास “एसीएस फोटोनिक्स’जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे.
निर्जंतुकीकरणासाठी अल्ट्रा व्हायोलेट प्रकाश किरणांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. मात्र व्यापक प्रमाणावर फैलाव झालेल्या करोना विषाणू, अथवा सार्स-कोव्ह-2 विषाणूला रोखण्यासाठी अल्ट्रा व्हायोलेट प्रकाश किरण किती उपयोगी ठरू शकतील हे अद्याप समजू शकलेले नाही.
वैद्यकीय उपकरणे, टेबलांचा पृष्ठभाग, फरशी आदींच्या निर्जंतुकीकरणासाठी “एचव्हीएसी’ सिस्टीमचा वापर केला जातो, असे युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया सांटा बार्बरातील या लेखाचे सहलेखक ख्रिश्चियन झोलिनर यांनी म्हटले आहे. झोलिनर यांनी अल्ट्राव्हायोलेट एलईडी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून निर्जंतुकीकरण आणि शुद्धता करण्याच्या उपाय योजनांबाबत संशोधन केले आहे. लहान लहान बाजारपेठेमध्येही युव्ही-सी निर्जंतुकीकरणासाठी उपयोगी उपकरणे उपलब्ध आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.
युव्ही-ए, युव्ही-बी आदी प्रकाश किरणे आपल्याला सूर्याकडून मोफत उपलब्ध होतात. दुर्मिळ युव्ही-सी हे प्रकाश किरण जमीन आणि पाण्याच्या शुद्धतेसाठी वापरले जाऊ शकतात. युव्ही-सी प्रकाश 260-285 नॅनोमीटर वेव्हलेंग्थच्या क्षमतेने निर्जंतुकीकरण करण्यास सक्षम आहे. पण ते मानवाच्या त्वचेसाठी मारकही आहेत. म्हणून निर्जंतुकीकरण करण्याच्यावेळी तेथे कोणीही उपस्थित असता कामा नये. युव्ही एलईडीद्वारे अधिक प्रगत तांत्रिक प्रगती केली जाऊ शकते, असेही झोलिनर यांनी म्हटले आहे. या लेखामध्ये उच्च गुणवत्तापूर्ण युव्ही एलईडीच्या सोप्या पद्धतीही देण्यात आल्या आहेत.