U-14 Virat Karandak – ग्रेसिया स्पोर्ट्स मॅनेजमेंट यांच्या तर्फे आयोजित ‘विराट करंडक’ १४ वर्षाखालील मुलांच्या अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत एके स्पोर्ट्स संघाने स्टार स्पोर्ट्स क्रिकेट अॅकॅडमी आणि अष्टपैलू स्पोर्ट्स या संघांचा पराभव करून सलग दोन विजयांची नोंद केली. अष्टपैलू स्पोर्ट्स आणि रायझिंग क्रिकेट क्लब या संघांनीही विजय नोंदवित आगेकूच केली.
धायरी येथील स्टार स्पोर्ट्स अॅकॅडमी मैदानावर सुरू असलेल्या स्पर्धेत अथर्व आखाडे याच्या ६७ धावांच्या जोरावर एके स्पोर्ट्स संघाने अष्टपैलू स्पोर्ट्स संघाचा १७ धावांनी पराभव केला. पहिल्यांदा खेळताना एके स्पोर्ट्सने १८२ धावांचे लक्ष्य उभे केले. यामध्ये अथर्व आखाडे याने ६७ धावांची खेळी केली. या आव्हानासमोर अष्टपैलू स्पोर्ट्सचा डाव १६५ धावा रोखण्यात आला.
प्रांजली पिसे आणि अर्पित कोकटे यांनी चमकदार गोलंदाजी करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. दुसर्या सामन्यात ओम पवार याच्या अचूक गोलंदाजीमुळे एके स्पोर्ट्स संघाने सय्यद क्रिकेट अॅकॅडमीचा १० गडी राखून सहज पराभव केला.
श्लोक चव्हाण याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर रायझिंग क्रिकेट क्लबने सय्यद क्रिकेट अॅकॅडमीचा ५ गडी राखून पराभव केला. दुसर्या सामन्यात शाश्वत पांड्या याच्या अष्टपैलु खेळीच्या जोरावर अष्टपैलू स्पोर्ट्स संघाने रायझिंग क्रिकेट क्लबचा ५ गडी राखून पराभव करत आगेकूच केली.