भरधाव बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

पुणे – भरधाव बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. ही घटना हडपसर येथील शेवाळवाडी फाटा येथे रविवारी घडली. याप्रकरणी कार चालक अनिल मांढरे(51,रा.मांजरी) याला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे.

नागसेन विश्‍वंभर नागटिळक (44,रा.बी.टी.कवडे रोड) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. ते सेंट्रींगची कामे करतात. याप्रकरणी त्यांचा भाचा केतन सवाणे याने फिर्याद दिली आहे. नागसेन हे सकाळी नऊच्या सुमारास दुचाकीवरुन कामाला जात होते. यावेळी शेवळवाडी फाटा येथे भरधाव वेगात मांढरे हा बस घेऊन चालला होता.

त्याच्या बसने ठोकरल्याने नागसेन रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले. यानंतर कार चालक खबर न देता पळून गेला होता. घटना घडली तेव्हा प्रत्यक्षदर्शीनी बस बघितली होती. त्यावरुन आरोपीला अटक करण्यात आली.. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक मनोज पाटील करत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.